प्रतिनिधी / कसबा बीड
कसबा बीड, ता. करवीर येथे प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आझाद हिंद झेंड्या समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वस्ताद संभाजी वरुटे यांचे हस्ते नांगर पूजन करून करण्यात आली. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे मध्यम, कर्ज पिक, कर्ज दीर्घ मुदत कर्ज, शेती पूरक घेतलेले कर्ज ,शेतकऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज ही सर्व कर्जे माफ करावीत. शेतकऱ्यांचा सातबाराच्या सर्व कर्ज नोंदी काढाव्यात अशी मागणी मुकुंद पाटील यांनी केली.
आंदोलनात अनिल बुवा, शिवाजी लोंढे, दादासाहेब देसाईं, युवराज पाटील, रणधीर पाटील, राहुल पाटील,आदी शेतकरी उपस्थित होते.
गेली दोन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनास माजी आमदार चंद्रदीप नरके, कुंभी कासारीचे व्हाईस चेअरमन उत्तम वरुटे, गोकुळचे संचालक सत्यजित पाटील ,परिषद सदस्य सुभाष सातपुते, शामराव सुर्यवंशी यशवंत बँकेचे संचालक, भगवान सूर्यवंशी आदी मान्यवर, भागातील सर्व शेतकरी यांनी उपस्थित राहून या आंदोलनास पाठिंबा दिला.