ऑनलाईन टीम
राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचा ठराव सभागृहात संमत करण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोधळ घातला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना इशारा देत ठराव संमत झाल्याची घोषणा केली.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. मंत्री छगन भुजबळ यांनी बाजू मांडताना केंद्र सरकारकडून इम्पेरील डेटा न मिळाल्याचं सांगितलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडत छगन भुजबळ यांच्यावर अर्धसत्य सांगितल्याचा आरोप केला.
२०१९ पर्यंत फडणवीसांनी काहीही केलं नाही. तोपर्यंत वेळ वाया घालवला आणि २०१९ ला घाईघाईत अध्यादेश काढला. मी फडणवीसांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी आयोगाला पत्र लिहिलं होतं. मात्र, केंद्राने इम्पिरिकल डेटा दिला नाही, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.









