ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना आणि कंगना रानौत वाद आता शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
आज विधीभवनाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहताना कंगनाचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले, बाहेरून आलेले काहीजणी महाराष्ट्राचे ऋण मानतात, तर काही जण मानत नाहीत.
आठवणीला उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रणव मुखर्जी अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांना कोणी ही शत्रू नव्हता, सगळ्यांनाच ते आपले वाटायचे, अशा शब्दात आदरांजली वाहिली.
माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी शोक प्रस्तावावेळी म्हटले आहे.








