ऑनलाईन टीम / मुंबई :
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याच अधिवेशात विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद मागील 9 महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं फुटण्याच्या प्रकार घडला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत. या नियमाला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूरी घेतली जाणार आहे. त्यानंतर 23 किंवा 24 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करुन एका दिवसात ही निवडणूक आटोपण्यात येईल. ही निवडणूक खुल्या मतदानाने होणार असल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीकडे 288 पैकी 170 संख्याबळ आहे. तर भाजपकडे 106 संख्याबळ आहे.








