तिरंगी लढतीत उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार
प्रतिनिधी / निपाणी, बेळगाव
विधानपरिषदेसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था गटातून 25 जागांसाठी मतदान होणार असून बेळगाव जिल्हय़ात दोन जागांसाठी होणारी तिरंगी लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. अखेरच्या टप्प्यात टोकाची राजकीय इर्षा झाल्याने त्याचा मतदारांना चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून 14 रोजी मतमोजणी होणार आहे.
गेल्या महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला उत्साह पाहायला मिळत नव्हता. भाजप व काँग्रेसतर्फे प्रत्येकी एक उमेदवार देण्यात येईल व निवडणूक बिनविरोध अथवा नाममात्र होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या दिवशी माजी मंत्री, आमदार रमेश जारकीहोळी यांचे कनि÷ बंधू लखन जारकीहोळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिह्यातील सर्वच राजकीय गणिते बिघडली.









