विद्युत जनित्र नादुरुस्त, पाण्याविना शेतकऱ्यांचे हाल सुरु
प्रतिनिधी / अक्कलकोट
दहिटणे अक्कलकोट तालुक्यातील दरी वस्ती येथील विद्युत जनित्र गेल्या आठ दिवसापासून जळाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली तरीदेखील विद्युत जनित्र नादुरुस्त राहिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून आस्मानी संकट आणि आता लाईट उपलब्ध नसल्याने सुलतानी संकट शेतकर्यांसमोर उभे राहिले आहे. गेल्या आठवडाभरापासून दरी वस्ती येथील विद्युत जनित्र जळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरू लागले आहे.
यंदा जास्त पावसामुळे संपूर्ण खरीप पीक वाया गेले आहे. तसेच कांद्याचे रोप देखील जास्त पावसामुळे जळून गेली आहेत. त्यातून शेतकरी कसा बसा सावरत असतानाच आता विद्युत जनित्र जवळ जळाल्यामुळे दरी वस्ती येथील शेतकऱ्यांना पाणी देणे जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याच्या रुपांना व इतर पिकांना घागरीने पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाप खाऊ देईना आणि आई भीक मागू देईना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे दरी वस्ती येथील विद्युत जनित्र लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरी वस्ती येथील विद्युत जनित्र हे कमी क्षमतेचे असल्यामुळे वारंवार यामध्ये बिघाड होत आहे. आम्ही वारंवार नवीन ज्यादा विद्युत जनित्राची मागणी केली असून विद्युत वितरण कंपनी याबाबत उदासीन आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आम्हाला लवकरात लवकर नवीन जादा जनित्र बसून द्यावे अशी मागणी आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









