उचगांव / वार्ताहर
विद्युत वाहिनीचा धक्का बसून राहुल अर्जुन लोखंडे (वय 29, रा वेंकटेशनगर, न्यू वाडदे, ता करवीर) या तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार न्यू वाडदे येथील वेंकटेश नगरजवळ झाला.
याबाबतची फिर्याद मृताचे वडील अर्जुन विठ्ठल लोखंडे ( रा. न्यू वाडदे ) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. व्यंकटेश नगर जवळून जाणाऱ्या 36 केवी पट्टणकडोली फिडरच्या विद्युत वाहिनीचा धक्का राहुल लोखंडे याला बसल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असुन अधिक तपास पोलिस हवालदार विराज डांगे करीत आहेत.
Previous Articleखानापूर तालुक्यातील अकरा रस्ते पुराच्या पाण्याने बंद
Next Article सांगली जिल्ह्यात नवे 237 तर 390 कोरोनामुक्त









