प्रतिनिधी/ पणजी
येथील विद्यूत भवनच्या खाली असलेल्या फुटपाथवर कचरा टाकून कित्येक दिवस झाले. अद्याप कचरा काढलेला नसल्याने फुटपाथवरून चालणाऱया लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा कचरा त्वरीत काढून फुटपाथ स्वच्छ करावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी विद्युत भवनाच्या परिसरात असलेल्या एका इमारतीच्या डागडूजीचे काम करण्यात आले होते. तसचे त्याच परिसरात असलेली धोकादायक मोठी झाडेही कापण्यात आली होती. कापलेली मोठमोठी झाले त्याच ठिकाणी जशास तशी पडून आहेत तर डागडूजीचे काम करताना तयार झालेला वचऱयाचे ढिगारे फुटपाथवर मांडून ठेवलेले आहे. विविध कामांसाठी त्या परिसरात येणाऱया लोकांना कचऱयाचा त्रास सहन करावा लागतो. हा कचरा त्वरीत काढावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.








