बाचणी ता.कागल येथील दुर्देवी घटना : एकुलता एक मुलगा व आईच्या मृत्यूने गावावर शोककळा
वार्ताहर/व्हनाळी
कपडे धुवून घरी परत येत असताना शेतातील पोलवरील महावितरणाची विद्युत प्रवाहीत तार तुटून अंगावर पडल्याने माय लेकराचा जागीच मृत्यू झाला. बाचणी (ता.कागल) येथे ही दुर्देवी घटना घडली. गीता गौतम जाधव (वय ३९) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय-१४) अशी या मृत माय लेकरांची नावे आहेत. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गीता जाधव या घरा पाठीमागील विहिरीत कपडे घुवून ऊसाच्या शेतातून घरी परत येत होत्या. दरम्यान यावेळी विद्युत खांबा वरील प्रवाहीत विजेची तार तुटून अंगावर पडल्याने गीता व हर्षवर्धन या माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला. तर सुदैवाने 10 वर्षाची मुलगी गैारी बचावली. सदर घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून घटनास्थळी कागलचे पोलिस निरीक्षक दतात्रय नाळे व महावितरणाच्या अधिका-यानी भेट देवून पंचनामा केला आहे.
गौतम जाधव यांचा एकुलता एक मुलगा व पत्नीचा आकस्मिक दुदैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयाबरोबरच गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









