प्रतिनिधी/ बेळगाव
विद्या आधार एज्युकेशन ऍण्ड रूरल डेव्हलपमेंट सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बेळगावचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी पूजा मंजुनाथ पाटील या विद्यार्थिनीची शैक्षणिक फी भरली. जैन पॉलिटेक्निकमध्ये तिसऱया वर्षात पूजा शिकत आहे. या विद्यार्थिनीच्या उच्चशिक्षणाची जबाबदारीसुद्धा डॉ. डुमगोळ व संस्थेने घेतली आहे.
सदर अर्थसाहाय्य वितरणप्रसंगी प्राचार्य विजय कलमनी, प्रा. प्रकाश सोनवाळकर, विद्या आधारचे संचालक विजय मोरे व संतोष ममदापूर उपस्थित होते.









