शाळेत धान्य पोहोचविण्यासाठी दररोज 8 किमी पायी प्रवास
आज देखील देशातील अनेक ठिकाणी पायी चालून पोहोचले जाऊ शकते. छत्तीसगडमधील एका गावात दैनंदिन सामग्रीसाठी देखील लोकांना अनेक किलोमीटरची पायपीट करून शहरात जावे लागते. डोंगराळ भागात रस्ते नसल्याने लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. बलरामपूर जिल्हय़ातील खडिया दामर गावातील शिक्षकांना शाळेत मुलांसाठी धान्य पोहोचविण्यासाठी दररोज सुमारे 8 किलोमीटरची पायपीट करावी लागते.
मुलांचे पोट भरावे म्हणून…

अनेक अडचणी आहेत, रस्ते अत्यंत खराब आहेत, विशेषकरून पावसाळय़ात अडचणी वाढतात. वन्यप्राण्यांकडूनही धोका असतो. तरीही आम्ही खांद्यावर धान्य घेत हा प्रवास करतो आणि शाळेपर्यंत धान्य पोहोचवितो असे शिक्षक सुशील यादव सांगतात. प्रतिदिन मध्यान्हात मुलांना भोजन मिळत रहावे याकरता ते हा प्रवास करत आहेत.
लोकांचा सलाम
एका व्हिडिओमध्ये शिक्षक कशाप्रकारे दररोज स्वतःच्या खांद्यावर धान्याची पोती घेऊन पाण्यातील वाट तुडवत जात आहेत हे दिसून येते. दोन्ही शिक्षक पायी आणि पँट वर करून प्रवाह ओलांडत असल्याचे यात नजरेस पडते. हा व्हिडिओ पाहिल्यावर सोशल मीडियावर लोकांनी या शिक्षकांना सलाम केला आहे.









