प्रतिनिधी / बेळगाव :
संस्कार आणि पालकांची मुलांबद्दल असणारी जबाबदारी हीच पुढे यशस्वीतेचे कारण ठरु शकते. विद्यार्थ्यांना दहावीचा टप्पा हा आपल्या पुढील भविष्यासाठी अधिक महत्वाचा आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षकांबरोबरच पालकांचे मार्गदर्शनही घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे मत लोहार यांनी व्यक्त केले.
ते हलगा (ता. बेळगाव) येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थिनींसाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन सोसायटीचे चेअरमन ए. एम. लोहार बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष टी. बी. सामजी व माजी अध्यक्ष के. एफ. चौगुले होते. पालक म्हणून परशराम बस्तवाडकर, जोतिबा संताजी यांच्यासह इतर विद्यार्थिनींचे पालकही यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण यांनी उपस्थितांचे पुष्प देवून स्वागत केले आणि मेळाव्याचा उद्देश सांगितला. यावेळी विषय शिक्षकांनी परीक्षेत येणाऱया स्वरुपाची माहिती दिली.
यावेळी सहशिक्षक व्ही. आर. घडी यांचेही मार्गदर्शन झाले. संस्थेंचे माजी चेअरमन के. एफ. चौगुले यांच्याबरोबरच इतरांनीही विद्यार्थिनींनी चांगले गुण घेवून उत्तीर्ण झाल्यास बक्षीसे जाहीर केली. सुत्रसंचालन एस. के. बिळगोजी यांनी केले. व्ही. आर. घाडी यांनी आभार मानले.