5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजाराचा दंड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लांजा येथील शाळेमध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनीची लैंगिक चाळे करणाऱया विजय शंकर इरमल (नाणीज, रत्नागिरी) या शिक्षकाला न्यायालयाने 5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. नुकताच विशेष न्यायालयातील न्यायाधीश व्ह़ी एस. राऊत यांनी या खटल्याचा निकाल †िदल़ा सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. अनिरूद्ध फणसेकर व ऍड. मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी लांजा येथील शाळेमध्ये शिकत होत़ी संशयित आरोपी त्याच शाळेत शिक्षक म्हणून कामाला होत़ा जानेवारी 2018 मध्ये पीडित विद्यार्थिनी शाळेत आली असता शिक्षक विजय इरमल याने तिची लैगिक छळवूणक केल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होत़ी त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केल़ा आरोपीविरूद्ध भादंवि कलम 354 (अ), 323, 506 व बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 9 (फ) नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे विजय इरमल याला न्यायालयाने 5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी न्यायालयामध्ये पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार व पोलीस कॉन्स्टेबल एऩ एस. कदम यांनी काम पाहिल़े









