प्रतिनिधी/ बेळगाव
ऐगळी (ता. अथणी) पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गावात आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
गुरुवारी 11 जून रोजी 15 वषीय पिडीत अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आठवीत शिकणाऱया या मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याचा आरोप असून ऐगळी पोलीस स्थानकात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
मुरग्याप्पा नामक अतिथी शिक्षकाला ऐगळी पोलिसांनी अटक केली आहे. या संबंधी पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









