प्रतिनिधी / दापोली
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी उद्या 6 नोव्हेंबर रोजी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.
तरी देखील शासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर हे कर्मचारी शनिवार पासून बेमुदत रजा आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.









