वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरात विविध प्लास्टीक कार्डमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रुपे कार्डची जागतिक स्तरावर ताकद वाढली असून जागतिक प्लास्टीक कार्ड बनवणाऱया कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मास्टर आणि व्हीजाकार्ड यांनी अमेरिकेत तक्रार दिली असल्याचे समजते.
साधारणपणे मागील काही वर्षांमध्ये भारताने रुपेला विविध टप्प्यावर पुढे आणले आहे. यामुळे व्हीजा इंक आणि मास्टरकार्डही काळजीत पडले आहेत. यावेळी डिस्कव्हर फायनान्शिअल सर्व्हिसेजचे डाइनर्स क्लबसोबत मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस डाटासंबंधीत स्थानिक नियमांबाबतीत भारतीय रिझर्व्ह बँकेसहची नियमावलीही संकटात सापडली आहे.
विदेशी तंत्रज्ञान
जर भारताला रुपेकार्डसाठी स्वतःच्या हिंमतीवर पुढे जायचे असेल तर कोणत्याही विदेशी किंवा अमेरेकी कार्ड फर्मच्या तंत्रज्ञानावर अधिक भरवसा ठेवता येत नाही. रुपेची जपानी जेसीबी इंटरनॅशनल कंपनीसोबत भागीदारीतून त्यांना कोणताही लाभ मिळण्याची शक्यता नाही.
60 कोटीपेक्षा अधिकचे कार्ड
सरकारकडून मिळणाऱया सहकार्यावर रुपे कार्डने 60 कोटीपेक्षा अधिकचे कार्ड सादर केले आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार 2017मध्ये हा आकडा फक्त 15 कोटी होता. जो वधारुन 2020 पर्यंत चार पटीने वाढला आहे. यामध्ये जास्तीत जास्त डेबिटकार्ड आहेत, जे सेव्हिंग खात्यांशी जोडलेले आहेत.









