प्रतिनिधी / कोल्हापूर
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर या विदर्भातील जिल्हÎासह पालघर जिल्हÎात होणाऱया जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोट निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पालकमंत्री सतेज पाटील यांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.









