स्वस्त ग्रहकर्जाची मागणी वाढण्याचे संकेत : संकलनातही घसरण शक्मय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महारामारीच्या कारणामुळे वित्त वर्ष 2021 मध्ये घरांच्या मालमत्तेची विक्री जवळपास 40 ते 60 टक्क्मयांनी घसरणार असल्याचे संकेत रेटिंग एजन्सी इक्रा यांच्या अहवालातून देण्यात आलेआहेत. ही संपूर्ण घसरण ही तयार आणि चालू बाधकाम या दोन्ही प्रकारच्या घरांच्या मालमत्तेचा यामध्ये समावेश राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बांधकाम क्षेत्रात सर्वसाधारणपणे मागणी कमी होत जात असल्याने यातील व्यवहाराबाबत मोठय़ा प्रमाणात जोखीम वाढत गेल्याची नोंद केली आहे. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवनी विक्री आणि संकलन यात मोठी घट होण्याचा अंदाजही मांडला आहे.
दुसऱया बाजूला रिझर्व्ह बँकेने दिलेली व्याजदर कपातीची संधी यामुळे घरांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आह. तर मागील 15 वर्षाच्या प्रवासता प्रथमच ग्रहकर्जावरील व्याजदर 8 टक्क्मयांच्या खाली गेल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा मागणी जोर धरण्याचे संकेत आहेत.
जुन्या बुकिंगचे पेमेंट प्रभावीत
कोविडच्या प्रभावामुळे ग्राहकांकडून अगोदरच आपली मालमता बुकिंग करुन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तेही पेमेंटची प्रक्रिया प्रभावीत झाली आहे. अन्य घडामोडीमध्ये ग्राहकांच्याकडून मिळणारे संकलन हे जवळपास 35 ते 40 टक्क्मयांनी घसरण्याचे संकेत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे कामगारांची कमी, विना गरजेच्या वस्तूंची पुरवठा साखळी खंडीत होत गेल्याने अनेक प्रकल्पाचे काम रखडल्याचे म्हटले आहे.









