सेन्सेक्सची भक्कम कामगिरी : निफ्टी 11,227.55 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या प्रभावामुळे देशातील शेअर बाजारात चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी वित्तीय आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये चमक पहावयास मिळाली आहे. सदरच्या जोरावर सेन्सेक्सने 593 अंकांची मजबूत कामगिरी नोंदवली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स 592.97 अंकांनी वधारुन निर्देशांक 37,981.63 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 177.30 अंकांनी वधारत 11,227.55 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक आठ टक्क्मयांची तेजी इंडसइंड बँकेने प्राप्त केली आहे. सदरच्या वाढीसोबत बजाज फिनसर्व्ह, ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा तेजीत राहिले आहेत. तर हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्लेचे समभाग लाल निशाण्यावर बंद झाले आहेत.
मागील आठवडय़ात बाजाराचा प्रवास हा चढउताराचा राहिला होता. यामध्ये जागतिक पातळीवर घडामोडींचा प्रभाव राहिल्याचे दिसून आले. युरोपमधील नव्याने होणारे लॉकडाऊन व व्यापार क्षेत्रातील घटनांचा यात समावेश राहिला आहे. परंतु चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी मात्र वाहन आणि औषध क्षेत्रातील समभागाना मिळणाऱया समर्थनामुळे निर्देशांक वाढीसह बंद झाला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
जागतिक पातळीवर बजारात थोडाफार उत्साह दिसला आहे. हाँगकाँग, टोकीयो आणि सियोलचा बाजार तेजीसह बंद झाला आहे. दुसरीकडे शांघायचा बाजार लाल निशाण नोंदवत बंद झाला आहे. युरोपियन बाजारही तेजीत राहिले होते. तसेच आगामी काळात येऊ घातलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातील पडसादही बाजारातील घटनांवर राहणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. तेल बेंचमार्क ब्रेट क्रूड 0.68 टक्क्मयांच्या घसरणीसह 42.12 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.








