मालवण/प्रतिनिधी-
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सारे वातावरण भक्तीमय झाले आहे. कट्टा हायस्कूलचे शिक्षक, छायाचित्रकार रांगोळीकार समीर चांदेरकर यांनी विठ्ठलाचे रूप तांदळाच्या एका दाण्यावर साकारले आहे. चांदेरकर यांनी छोट्या तांदळावर विठ्ठलाचे चित्र साकारून अंन्नाचा प्रत्येक कण महत्त्वाचा आहे. त्यामुळे अन्न वाया घालवू नये असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तांदळावर साकारलेल्या कलाकृतीचे कौतुक होत आहे. छोट्याशा तांदळावर अशा पद्धतीने कलाकृती साकारल्याचे निदर्शनास आले नाही. तांदळावर नावे, भारत देशाचा नकाशा अशा कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे तांदळावर साकारलेल्या विट्ठलाच्या कलाकृतीची ग्रीनीज बुक ऑफ रेकॉडमध्ये नोंद व्हावी यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याचे चांदेरकर म्हणाले.









