साखळी/ प्रतिनिधी
साखळ विठ्ठलापुर येथे “दीपावली बाजार “चे तिनं दिवशी य आयोजन करण्यात आले आहे या बाजार चे उद्घाटन साखळीच्या नगरसेविका तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य शुभदा सावइकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक सरपंच उज्वला कवळेकर,सोनल पित्रे ,सोनाली बापे यांची उपस्थितीत होती. स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसीत करणे महिलांसाठी महत्त्वाचे आहे अश्या विविध कलागुणांना समोर आणू एक नविन ओळख आपण निर्माण केली आहे आपण वेळेचा सदुपयोगकरून समाजाला काही करून दाखवले पाहिजे या दिवाळीच्या निमित्ताने भरवलेल्या प्रदर्शनात सर्व महिलानी का÷ा ने विविध वस्तू बनवल्या आहे त्या बद्दल अभिनंदन स्वतः कमावलेले पैसे आम्हाला खूप काही शिकवून जाते पूर्ण गोवा भर हा उपक्रम राबवला जावा असे मत शुभदा सावईकर यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले सरपंच कवळेकर यांनी ही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका सतोस्करकामत यांनी केले यात 30 महिलानी दुकाने थाटली आहेत या प्रदर्शन तथा विक्रीमध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील दिवाळीनिमित्त लागणाऱया पणत्या तसेच अनेक मातीची भांडी शिवाय फराळाचे विविध प्रकार,मिठाई, कपडे ,तोरणे आयुर्वेदिक साबण तसेच विविध प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने इत्यादी अनेक याठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे वेदमूर्ती घनश्याम शास्त्री जावडेकर सभागृह विठ्ठलापूर साखळी येथे होणार आहे प्रदर्शन स.10 ते सायं.8 वा.रविवार दि.8 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे









