प्रतिनिधी / विटा
कोरोना बाधितांची वाढणारी संख्या आणि उपलब्ध आरोग्य यंत्रणा तसेच आगामी काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीची करावयाची उपाययोजना, याबाबत चर्चा करण्यासाठी विटा बचाव कोरोना समितीने पुढाकार घेतला. लोकप्रतिनिधी व प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक झाली. यामध्ये खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेणे, विट्यात कोरोना हॉस्पिटल उभारणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विटा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपायोजना सुरु आहेत. मात्र वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत विटा बचाव कोरोना समितीच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली. कोरोना चाचणी, सद्यस्थितीत उपलब्ध बेड आणि प्रशानाने केलेल्या उपाययोजना अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
बैठकीत विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पिटल उपलब्ध करावे, अशी मागणी केली. त्याचबरोबर 100 बेडचे हॉस्पिटल उभा करावे, अशी मागणी केली. त्यानुसार खाजगी हॉस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. कोविड सेंटर जय माता दी मंगल कार्यालय येथे येत्या 10 – 15 दिवसात ऑक्सिजन बेडसहित करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास अथवा कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यास प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा विटा बचाव कोरोना समितीच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सीलचे अध्यक्ष विजय पाटील, यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








