प्रतिनिधी / विटा
विटा शहराला कोरोना विषाणूने पुन्हा दणका दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील 27 वर्षीय परिचारिका बाधित झाल्याचे आढळून आल्यानंतर दुपारी कोरोनाने नगरपालिकेत शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. पालिकेतील एक लिपिक आणि स्वच्छता विभागातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विटा नगरपालिका सील करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी विट्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका कोरोना बाधित असल्याचे अहवालातुन स्पष्ट झाले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. या परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्वारंटानमधील रहिवासी आहेत. याशिवाय मंगरूळ येथील कोरोना बधिताच्या संपर्कातील 55 आणि 27 वर्षीय पुरुषांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान कोरोना बाधित कर्मचारी आढळून आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली
तालुक्यात 56 रुग्ण
विटा शहरात आजपर्यंत 22 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून खानापूर तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा 56 वर जाऊन पोहचला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.
आरोग्य विभागानंतर कोरोना व्हायरसने विटा पालीकेत देखिल शिरकाव केला आहे. विटा पालिकेतील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या कर विभागातील एक आणि स्वच्छता विभागातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने नगरपालिका सील केली आहे. कोरोना बधितांच्या संपर्कात असलेल्यांची प्रशासनाकडून शोध सुरू आहे. विटा ग्रामीण रुग्णालय येथे नगरपालिका कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात आली.16 व्यक्तीच्या तपासणी पैकी 3 नगरपालिका कर्मचाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट पोजिटीव्ह आल्याने खळबळ माजली.
गरज पडल्यास आणखी अंटीजन टेस्ट – मुख्याधिकारी
नगरपालिका कार्यालय सील करण्यात आले आहे. पालिकेत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे संपर्क शोधण्याचे काम सुरू आहे. गरज पडल्यास आणखी काही कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेंन करण्यात येईल, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिली.
Previous Articleसोलापूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून माढा तालुक्यासाठी ११ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर- आ.बबनराव शिंदे
Next Article कलर टीव्हीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून बंदी








