आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथील घटना
दिघंची / वार्ताहर
डंपरमुळे तुटलेल्या विजेच्या तारात अडकून पडल्याने शाहिर वसंत बनसोडे (वय 50) रा.देवापुर, ता.माण, जि-सातारा हे कृषी सहाय्यक जागीच ठार झाले.सध्या दिघंची -हेरवाड महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.साईड पट्ट्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सातारा जिल्ह्यातील देवापुर येथील शाहीर वसंत बनसोडे हे आटपाडी येथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत होते.नेहमीप्रमाणे देवापुर वरून ते आटपाडी ला निघाले होते.10 वाजण्याच्या सुमारास विठलापूर ओढ्याजवळ मुरूम ने भरलेला डंपर उरळताना चालकाला अंदाज न आल्याने रस्त्याच्या वरून जाणारी विजेची तार तुटली आणि अचानक समोर आलेल्या तारेत अडकून शाहीर बनसोडे हे आपल्या दुचाकीरून पडले.त्यावेळी डोक्याला गंभीर इजा झाल्याने डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने ते जागीच ठार झाले.
यावेळी घटनास्थळी बघ्यानी मोठी गर्दी केली होती.यावेळी कृषी सहाय्यक शाहीर बनसोडे यांचा अचानक अपघातात मृत्यू झाल्याने घटनास्थळी नागरिक हळहळ व्यक्त करत होते.








