प्रतिनिधी/ बेळगाव
विजेचे बिल भरण्यासाठी दररोज शेकडो नागरिक हेस्कॉमच्या बिल भरणा केंद्रांवर येत आहेत. परंतु या ठिकाणी ना सोशल डिस्टसिंग ना सॅनिटायझरचा वापर. यामुळे धोका वाढला असून हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनाही धोका वाढला आहे. याकडे हेस्कॉमचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सोशल डिस्टसिंग राखणे गरजेचे आहे.
दोन महिन्यानंतर बिल देण्यात आल्याने ते भरण्यासाठी एकाचवेळी गर्दी होत आहे. सर्वांना आतमध्ये प्रवेश दिला जात असल्यामुळे गर्दी होवू लागली आहे. त्यातच वाढिव विजबिलाच्या तक्रारी करण्यासाठी गर्दीत भर पडत आहे. रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालय, तसेच नेहरू नगर येथील कार्यालयात गर्दी होवू लागली आहे.
हेस्कॉमकडून खबरदारी हवीच
ज्या व्यक्तींकडे मास्क आहे अशाच व्यक्तींना प्रवेश दिला जावा. कार्यालयात मर्यादित व्यक्तीनाच प्रवेश देवून त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. नागरिकांची वाहने बाहेर लावण्याची व्यवस्था करावी. एकाचवेळी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
ग्राहक चौकशीसाठी थेट कर्मचारी व अधिकाऱयांपर्यत जात आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱयांना धोका वाढला आहे. इतर कार्यालयांमध्ये खबरदारी घेतली जात आहे तर हेस्कॉमच्या कार्यालयांमध्ये का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निदान कर्मचाऱयांचा विचार करून तरी हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांनी सोशल डिस्टसिंग पाळावे अशी मागणी होत आहे.









