कालिकत : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा आजपासून कसोटी मालिका खेळवली जाणार असून या पार्श्वभूमीवर कालिकतमधील मलाबार ख्रिस्तियन कॉलेजचे सहयोगी प्रा. वशिष्ट एम.सी. यांनी विजय हजारे व जसू पटेल यांच्या कामगिरीचा सन्मान करणारे भित्तीपत्रक प्रसिद्ध केले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका इतिहासात विजय हजारे व जसू पटेल यांनी विशेष ठसा उमटवला आहे.
1948 साली विजय हजारे यांनी ऍडलेड कसोटीतील दोन्ही डावात तडफदार शतके झळकावली होती तर जसू पटेल यांनी 1959 मधील कानपूर कसोटीत 14 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला होता. याच लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला विजय नोंदवला. हजारे व जसू पटेल हे दोघेही 1960 मध्ये पद्मश्री पुरस्कार लाभणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले होते.