ऑनलाईन टीम
भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुंबईतील संपत्तीचा अखेर लिलाव करण्यात आला. मल्ल्याची मालकी असलेले किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुंबईतील मुख्यालय म्हणजेच किंगफिशर हाऊस लिलावात विकले गेले आहे. हे घर हैदराबादस्थित सॅटर्न रियल्टर्सने ५२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
२०१९ मध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील किंगफिशर हाऊसचा आठव्यांदा लिलाव करण्यात आला होता. पण त्याला कोणीच घेतलं नाही. त्याची ओरिजनल किंमत १५० कोटी होती. डेट रिकव्हरी टर्ब्युनलकडून त्या घराचा लिलाव करण्यात आला होता.
आतापर्यंत माल्याची प्रॉपर्टी विकून ७५२० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, बँकांच्या एका संघाचे माल्याकडे एकूण १० हजार कोटी रुपये थकीत आहेत. या संघाची प्रमुख बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. लंडन हायकोर्टाने जुलै महिन्यात दिवाळखोर घोषित केलं होतं. त्यामुळे भारतातील बँका त्याच्या संपत्तीवर कब्जा करू शकतात तसेच त्या विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








