गोडोली / प्रतिनिधी :
सातारच्या गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी आणि व्यावसायिक हणमंतराव कणसे(अंगापूर) यांचा चिरंजीव विजय कणसे याने अमेरिकेत ओखलामा युनिव्हर्सिटीमध्ये इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट या विषयात उच्च शिक्षण पदवी (MS) संपादन केली.
लहानपणापासून तंत्रज्ञान विकसित करण्याची आवड जोपासणाऱ्या विजयने अमेरिकेत ओखलामा युनिव्हर्सिटीत दोन वर्षात इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट (MS) ही पदवी गुणवत्ता यादीत चमकत पुर्ण केली. नुकताच झालेल्या पदवीदान समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते ही पदवी बहाल करण्यात आली.
अजूनही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून त्याबद्दल अधिक उपयुक्त ज्ञान आत्मसात करण्यासाठी दोन वर्षे अमेरिकेत राहणार आहे. त्यानंतर देशासाठी अधिक सक्षमपणे औद्योगिक क्षेत्रातील विकासासाठी काम करण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्या ज्ञानाचा भविष्यात देशासाठी उपयोग करण्याचा माझा मानस असल्याचे विजयने यावेळी सांगितले.









