प्रतिनिधी/बेळगाव
विजया ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. रवी पाटील आणि विरेश हिरेमठ यांनी मच्छे येथील निराश्रित परिहार केंद्राला भेट देऊन शंभरहून अधिक गरजूंना अत्यावश्यक अशी औषधे वितरित केली. यावेळी केंद्राचे निरीक्षक एम. एफ. मेगाडे उपस्थित होते.
गंगाधर एस. एम., शशीकांत चलवादी, मारुती लोकुर, विजय पवार, संतोष धोत्रे, मल्लिकार्जुन मलाडी आदी यावेळी उपस्थित होते. या मदतीबद्दल मेगाडे यांनी विजया हॉस्पिटलचे आभार मानले.