ऑनलाईन टीम / मुंबई
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात तिसऱ्यांदा बंगालच्या जनतेनं ममता बॅनर्जी यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. यामूळे तृणमूल काँग्रेसच सरकार पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये स्थापन होणार असल्याचे असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच देशभरात कोरोनाने हाहाकार उडाला आहे, अनेक राज्यात रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सुविधांची उणीव भासत आहे. आरोग्य सुविधां अभावी नागरिकांचे बळी जात आहेत. यावरुन आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यामध्ये थेट केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधला जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. सत्तापिपासू वृत्तीने प.बंगाल मध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या मोदीजींच्या अतिमहत्वाकांक्षेला बंगालच्या जनतेने धूळ चारली व या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले. जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते. असे म्हटले आहे. अशा प्रकारे बंगालच्या निवडणुकीवर संपुर्ण देशातुन लक्ष्य लागल असताना यावर अगदी निवडक प्रतिक्रीया ही येत आहेत.