प्रतिनिधी बेळगाव
टिचर्स कॉलनी, विजयनगर येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
संजय शिवपुत्र सुतार (वय 27) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून सेल्स एक्झिक्मयुटिव्ह म्हणून तो काम करत होता. बुधवारी दुपारी चारनंतर त्या तरुणाने आपल्या बेडरुमच्या दरवाजाला आतून कडी लावून बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दोन वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले आहे. आईच्या निधनाच्या मानसिक धक्क्मयातून तो अद्याप सावरला नव्हता. घरात वडील व दोन भावांसमवेत तो राहात होता. याच कारणाने संजयने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.