बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने नव्याने गठित विजयनगर जिल्ह्याच्या हद्दी निश्चित करण्याच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. विजयनगरसह आता राज्याचा ३१ वा जिल्हा आहे. विजयनगर साम्राज्याच्या राजधानीच्या नावावर, नवीन जिल्हा कर्नाटक जमीन महसूल अधिनियम, १६४ अन्वये बळ्ळारीचे विभाजन करून निर्माण केला आहे.
हैदराबाद-कर्नाटक भागातील विजयनगर, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांकरिता प्रसिद्ध आहे. हम्पी आणि विरुपक्ष मंदिर ही महत्वाची पर्यटन स्थळे आहेत .
होसापेटेहे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. तर विजयनगरात सहा तालुक्यांचा समावेश असेल. यामध्ये होसापेटे, कुडळीगी, हगारीबोम्मनहळ्ळी, कोट्टुरू, हूविना हदगळी आणि हरपनहळ्ळी तालुक्यांचा समावेश असेल.