गांभीर्याने दखल घेऊन तातडीने समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
विजयनगर, चौथा क्रॉस येथे धोकादायक रस्ता बनला आहे. चौथा व तिसरा क्रॉस येथे असणारा रस्ता खाली-वर झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने येथील समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया विजयनगर चौथा क्रॉस येथे कंत्राटदाराच्या प्रतापामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे. जोडणाऱया रस्त्यांवरच खड्डा पडल्याने गतिरोधकाचा अनुभव येत आहे.
त्यामुळे या परिसरातील जोडणारे रस्ते सुस्थितीत ठेवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. या रस्त्यामुळे अपघात घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.









