वार्ताहर / दोडामार्ग:
गोव्याहून कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलर मधून 1 लाखाची दारू पकडली. विजघर येथील चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आंध्रप्रदेश मधील एकास ताब्यात घेण्यात आले असून दारू व ट्रॅव्हलर मिळून पोलिसांनी तब्बल 9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गोव्याहून घाटमाथ्यावर जाणाऱ्या फोर्स कंपनीच्या एका टेम्पो ट्रॅव्हलरची विजघर येथील चेक पोस्ट ठिकाणी तपासणी करताना ट्रॅव्हलर मध्ये 1 लाख 16 हजार 810 रुपयांची दारू आढळून आली. चेकपोस्टवर तैनात पोलिस नाईक राजेश गवस, पोलीस आशिष लवांगरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन गवस, दीपक सुतार यांनी ही गाडी तसेच आतील मुद्देमाल ताब्यात घेतला. दारू तसेच 8 लाख रुपयांचा टेम्पो ट्रॅव्हलर असा मिळून एकूण 9 लाख 16 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी महेंदर चिन्नय्या काटना (वय -27 ) (रा. घर नं. 2-49 नरसप्पागुडा, कोथुर, मेहबूबनगर, आंध्रप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस आशिष लवांगरे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. काल मंगळवारी रात्रौ 8 वा. सुमार ही कारवाई झाली.
Previous Articleसांगली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी
Next Article ZP पोटनिवडणुकीत खासदार गावितांचा मुलगा पराभूत









