ताबा सुटलेल्या ट्रकची कारसह 3 दुचाकींना धडक : महामार्गावरील हातखंब्यातील अपघातात दोघांची प्रकृती गंभीर : दुचाकींना 100 फुट नेले फरफटत
प्रतिनिधी / रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे चालकाचा ताबा सुटलेल्या ट्रकने कारसह 3 दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल़ा ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडल़ी या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून अन्य 10 जण जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आह़े यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
सतीश कोंडीबा डांगरे (40, ऱा इचलकरंजी कोल्हापूर) असे मृताचे नाव आह़े तर दुचाकीवरील जयश्री सतीश डांगरे व शुभांगी सोमनाथ डांगरे (40, ऱा दोन्ही कोल्हापूर) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱया ट्रकचालकाला स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल़े अजिजूउल्ला असमोहम्मद (36, ऱा उत्तरप्रदेश) असे ट्रकचालकाचे नाव आह़े पोलिसांकडून †िमळालेल्या माहितीनुसार, सतीश डांगरे हे आपल्या नातेवाईकांसह 3 दुचाकींवरून कोल्हापूर येथून गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येत होत़े यावेळी ट्रकचालक अजिजूउल्ला हा ट्रक (एमएच 08 डब्लू 3945) घेवून कोल्हापूर ते रत्नागिरी असा घेवून येत होत़ा हातखंबा गाव येथे दुपारी 12.30च्या सुमारास ट्रकचालक अजिजूउल्ला याचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रकची रत्नागिरीच्या दिशेने येणाऱया झेन कारला (एमएच 01 एई 334) मागून धडक बसल़ी
या अपघाताने बिथरलेल्या ट्रकचालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याच्या उद्देशाने जोराने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केल़ा यावेळी ट्रकवरील त्याचा पुन्हा ताबा सुटल्याने समोरील 3 दुचाकींना जोरदार धडक दिल़ी ही धडक ऐवढी भीषण होती की, सतीश डांगरे यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच 09 डीसी 7392) हिला 100 फुटांहून अधिक फरफटन नेल़े यामध्ये सतीश याचा जागीच मृत्यू झाल़ा यात तीनही दुचाकींवरील 8 जण व कारमधील दोघेजण जखमी झाल़े
सतीश यांच्या दुचाकीवरील त्यांची मुलगी ऋतुजा सतीश डांगरे (15), पत्नी जयश्री सतीश डोंगरे, अन्य दुचाकीस्वार सोमनाथ कोंडीबा डांगरे यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच 09 ईई 2697) वरील मुलगी अर्पिता सोमनाथ डांगरे (15), शुभांगी सोमनाथ डांगरे (40) तसेच श्रीशल राजू डांगरे (21) यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच 096 एफजी 8543) वरील प्रिया राजू डांगरे (23) व शोभा राजू डांगरे (51, ऱा सर्व गणेशनगर इचलकरंजी, कोल्हापूर) असे कोल्हापूर ते गणपतीपुळेत येणारे जखमी झाल़े हे सर्वजण नातेवाईक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तर हातखंबा ते रत्नागिरी असे येणारी झेन कारमधील (एमएच 01 एई 334) चालक प्रदीप बाळकृष्ण पटवर्धन (34) व त्यांचे वडील बाळकृष्ण दत्तात्रय पटवर्धन (73, ऱा कासारवेली रत्नागिरी) हे दखील या अपघातात जखमी झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होत़ी मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून लोकांची गर्दी कमी करून वाहतूक सुरळीत केल़ी दरम्यान या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येत आह़े
ट्रकचालकाचा पळ काढण्याचा प्रयत्न ठरला फोल
अपघातानंतर ट्रकचालक अजिजूउल्ला याने घटनास्थळावरून जंगलमय भागाकडे पळ काढण्याचा प्रयत्न केल़ा मात्र यावेळी सजग असलेल्या स्थानिक रहिवाशांनी अजिजूउल्ला याचा पाठलाग केल़ा अखेर स्थानिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल़े