प्रतिनिधी / कागल
हे विघ्नहर्ता गणपती देवा ! कोरोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री गणरायाला घातले. कागलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे . मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली.
येथील कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिले उदाहरण आहे.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीचे सावट श्री गणरायाच्या या उत्सवावर सुद्धा आहेच. या महामारीमुळे जनता गणरायाच्या स्वागताबरोबरच उत्सव आणि विसर्जनही आनंदाने करू शकत नाही. त्यामुळे जनता दुःखी झाली आहे. गणपती हा विघ्नहर्ता म्हणून लौकिक आहे. गणपतीच्या आशीर्वादामुळे कोरोनाचे महाभयानक संकट लवकरच दूर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली. आढावा बैठकीत बोलताना म्हणाले, अटीजेन टेस्ट घ्या, त्यामुळे पेशंट बाहेर येतील. पेशंट बाहेर आल्यामुळे कुटुंब आणि गाव वाचेल यासाठी टेस्टिंग वाढवणे गरजेचे आहे. लक्षणे असतील तर लगेच कुटुंबापासून वेगळे व्हा व मास्क वापरा, हात धुवा. आयसीएमआरने आता सगळीकडे तपासणीसाठी परवानगी दिली आहे त्यामुळे तपासणीसाठी पुढे या. जीवन महत्त्वाचे आहे मास्क हाच मार्ग आहे.
ते म्हणाले, तालुक्यात एकूण ५५० रुग्ण पॉझिटिव्ह झाले. यापैकी ३०४ बरे झाले. सध्या २२८ जणांच्यावर उपचार सुरु असून १८ जणांचे दुर्देवी मृत्यू झाले आहेत . अॅन्टीजेन टेस्ट ११०० जणांची झाली, यापैकी १०९ पॉझिटिव्ह सापडले. मास्क हाच बचावाचा मार्ग असून लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. तरच आपले कुटूंब सुरक्षित राहणार आहे .
या बैठकीला कागलच्या तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. बी. शिंदे , जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता श्री. ए. जी. चांदणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे , कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी श्रेयस जुवेकर, नगरसेवक प्रविण काळबर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, आरटीओ चेकपोस्टचे व्यवस्थापक नीलेश भोसले आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









