मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले निर्बंध, नियम आणि कोरोना विघ्न असतानाही राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध घालून दिले आहे. तसेच सर्वांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम लागू केलेले असले तरी गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.. अनेक ठिकाणी कोरोना कोरोना नियमांचे पालन करत भक्तांनी गणरायांची प्रतिष्ठापना केली.
महाराष्ट्रासह देशभरात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा झाला. यंदा मात्र गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गणेश भक्तांचा हाच उत्साह आता पुढील १० दिवस कायम राहणार असून कोरोनाचं संकट लवकरात लवकर टळावे यासाठी सर्व गणेशभक्त लाडक्या गणपती बाप्पाला साकडे घालणार आहेत.








