सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील पथविक्रेते, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, हात गाडीवाले आदी विक्रेत्यांनी कोरोना टेस्ट येत्या 10 दिवसात करुन घ्यावी. अन्यथा त्यांचे लायसन रद्द व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.
महापालिकेने शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व विक्रेत्यांना येत्या 10 दिवसात कोरोनाची रॅपिड टेस्ट करुन घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात अडकवावे, अशा सक्त सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. जे विक्रेते कोरोनाची टेस्ट करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, संबंधितांचे परवाने रद्द व फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी काढले आहेत.
Previous Articleबेळगाव जिह्यात शुक्रवारी 76 जणांना कोरोनाची बाधा
Next Article मी डोलकर.. डोलकर.. दर्याची राणी..!









