ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 3 लाख 86 हजार 452 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनचा दैनंदिन रुग्णवाढीचा हा सर्वात मोठा आकडा आहे. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. गुरुवारी 2 लाख 97 हजार 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3498 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 53 लाख 84 हजार 418 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 31 लाख 70 हजार 228 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 08 हजार 330 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 15 कोटी 22 लाख 45 हजार 179 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 28 कोटी 63 लाख 92 हजार 086 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 19 लाख 20 हजार 107 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.29) करण्यात आल्या.









