ऑनलाईन टीम / मुंबई :
जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. सरकार ने दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन केले पाहिजे. मात्र, लॉक डाऊन च्या काळात पोलिसांवर हल्ले करणारे, आरोग्य यंत्रणेला त्रास देणाऱ्यांना तसेच मरकज मध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे असे खळबळजनक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, गैरवर्तन करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवावा. यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल किंवा काही कारस्थान वाटत असेल, तर त्यांना जग कशाला? अशा लोकांना सरळ गोळ्या घालून ठार करा.
त्याचबरोबर भाज्यांवर थुंकणारे, नर्स समोर नग्न होणारे यासारख्या फोडून काढा. त्यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपचार बंद करून टाकले पाहिजेत, असं ही ते म्हणाले.
लॉक डाऊन थोड्या दिवसांसाठी आहे. नंतर आम्ही आहोतच. आक्षपार्ह वागणाऱ्या फोडून काढले पाहिजे असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
तसेच पंतप्रधानांनी दीवा लावण्याचे आवाहन केले आहे. यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.