वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील नव्याने बांधण्यात आलेल्या अनेक पुलावरील नामफलकाचे अज्ञाताकडून नासधूस केल्याचे बाब उघडकीस आलेली आहे. यामुळे खळबळ निर्माण झालेली आहे. अनेक पुलावर मंत्री महोदय यांच्या नावाने नामफलक लावण्यात आले होते. ते फोडून त्याची नासधूस करण्यात आलेली आहे .यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आले येत असून विरोधकांकडून अशाप्रकारची बाब करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयांमध्ये गेल्या दहा वर्षात अनेक ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आलेले आहेत. दळणवळणाची सुविधा अधिक सुटसुटीत व संपर्क रस्ता निर्माण व्हावा यासाठी मागील काँग्रेस व भाजपा सरकारने अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आलेल आहेत. खास करून सत्तरी तालुक्मयांमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची पुले उभारण्यात आलेली आहेत .सदर पुलाची बांधकाम करताना व उद्घाटन करताना नामफलक लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पद्धतीने मंत्र्यांहस्ते होते .मात्र सदा नामफलकाची अवस्था पाहता अनेक ठिकाणच्या नामफलकाचे नासधूस केल्याची बाब समोर आलेली आहे.
हेदोडे पुलाच्या नामफलक नासधूस.
वाळपई मतदार संघातील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये हेदोडे याठिकाणी कोटय़वधी खर्चून पुलाची उभारणी करण्यात आली होती .यासाठी स्थानिक आमदार तथा गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी खास प्रयत्न केले होते. सदर ठिकाणी अरुंद स्वरूपाचा पुल होता .यामुळे हेदोडे गावातील नागरिकांना त्याचप्रमाणे ठाणे पंचायत क्षेत्रातून नगरगाव पंचायत क्षेत्रांत जाण्यासाठी ऱयाच प्रमाणात अडचण निर्माण होत होती .
यासंदर्भाची दखल घेऊन आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी पुढाकार घेत सदर ठिकाणी गोवा सरकारच्या पायाभूत साधन सुविधा मंडळातर्फे कोटय़वधी खर्चून पुलाची उभारणी करण्यात आली. पुलाच्या भूमिपूजन सोहळा वेळी नामफलकाचे अनावरण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पुल पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनप्रसंगी नामफलकाचे अनावरण करण्यात आले होते .मात्र यानामफलकाचे अज्ञात नागरिकांकडून विध्व?स करण्यात आलेला आहे .यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाची चिंता व्यक्त केली आहे. काही नागरिकांच्या मतानुसार सदर बाब राजकीय विरोधकांकडून होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तर काही नागरिकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पुलाची उभारणी झाली असली तरी सदर पुलाकडून ठाणे हमरस्त्यावर येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मात्र मोठमोठे दगड असून त्याठिकाणी वाहतूक करणे म्हणजे प्रवाशांसाठी अत्यंत डोकेदुखी बनत आहे .संतापामुळे काहींनी नामफलकाचे नुकसान केल्याचे समजते.
समीक्षा सालेलकर
सदर भागाच्या पंच सभासद तथा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच समीक्षा सालेलकर यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा प्रकारचे कृत्य करणे अत्यंत खेदाची असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. रोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी खास प्रयत्न करून या ठिकाणी पूल बांधण्यात आला होता. त्याठिकाणी नामफलक लावण्यात आले होते .मात्र अशाप्रकारे नामफलकाचे नासधूस करून आपल्यातील संताप अशाप्रकारे व्यक्त करणे हे दुर्दैवी असल्याचे समितीच्या स्पष्ट केले आहे.
सरपंच प्रशांत मराठे.
त्याप्रमाणे नगरगाव पंचायतीचे सरपंच प्रशांत मराठे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त यांना संताप व्यक्त केलेला आहे. नागरिकांनी विकासासाठी सहकार्य करणे व विकास झाल्यानंतर त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांची असते .मात्र अशा प्रकारे आपला वैयक्तिक राग विकासाच्या प्रकल्पावर काढणे बरोबर नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.









