वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट अखेर आजपासून 14 जानेवारीला विंडोज 7 चे सर्व सपोर्ट बंद करत आहे. 9 वर्ष जुन्या असणार्या या ऑपरेटिंग सिस्टिमला आत्तापासून कोणताही सपोर्ट उपलब्ध राहणार नसून, यात सुरक्षेच्या अपडेटचाही समावेश आहे. त्यामुळे यूजर्सची सायबर सुरक्षा धोक्यात येणार आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने विंडोज 7 च्या यूजर्सना विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अपग्रेड करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
विंडोज 7 चा सपोर्ट बंद झाल्यामुळे आशियातील पर्सनल कॉम्प्यूटरच्या व्यवसायाला जोरदार चालना मिळण्याची शक्यता आहे. सध्या आशियात आत्तापर्यंत 35 टक्के इंटरप्राइजेस विंडोज 7 वापरत आहेत. त्यांना आपल्या कॉम्प्यूटरद्वारे व्हॉल्यूम परवाना विंडोज 10 प्रो किंवा विंडोज 10 इंटरप्राइजमध्ये अपग्रेड करावा लागेल, नसेल तर नवीन कॉम्प्यूटर खरेदी करावा लागेल.