नवी दिल्ली
विंडी लेकसाइड इन्वेस्टमेंट लिमिटेड लवकरच अदानी पोर्ट्समध्ये जवळपास 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार प्रायवेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंक्सची कंपनीने या गुंतवणुकीच्या आधारे अदानी पोर्ट्समधील 0.49 टक्क्यांची हिस्सेदारी विकत घेतली आहे. गुंतवणूक कंपनीला अदानी पोर्ट्स एक कोटी समभाग देणार आहे. अदानी पोर्ट्स ऍण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे समभाग शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजारात 749.65 रुपयावर बंद झाले होते.









