वृत्तसंस्था/ लंडन
विंडीज संघाविरूद्ध होणाऱया मालिकेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व जो रूटकडे सोपविण्यात आल्याची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे अंतरिम संचालक स्ट्रॉसने केली आहे.
नुकत्याच झालेल्या ऍशेस मालिकेतील खराब कामागिरीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड तसेच साहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहॅम थॉर्प यांची हकालपट्टी केली. ख्रिस सिल्व्हरवूड आणि थॉर्प यांना शुक्रवारी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.
इंग्लंडने विंडीजविरूद्धच्या पाच सामन्यांची टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी राखल्यानंतर विंडीजने शेवटचा सामना जिंकून ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली आहे. आता उभय संघामध्ये कसोटी मालिकेला 8 मार्चपासून प्रारंभ होणार आहे.









