किंग्स्टन (जमैका)
यजमान विंडीज व आयर्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेत काही बदल केले गेले असून यानुसार उभय संघातील एकमेव टी-20 लढत रद्द करावी लागली आहे. दोन्ही संघ गुरुवारी दुसरी वनडे तर शनिवारी तिसरी वनडे खेळतील. कोरोनाचा शिरकाव आणि आयरिश खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे हा निर्णय घेण्यात आला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, उभय संघातील दुसरी वनडे मंगळवारी होणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही सामने उशिराने खेळवणे भाग असल्याने एकमेव टी-20 सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.









