सांगली / प्रतिनिधी
वाहन चोरी झाल्यानंतर कच्ची नोंद केली मात्र पक्की फिर्यादी देण्यास उशीर लावला म्हणून वाहन चोरीचा विमा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक न्यायालयाने धक्का दिला आहे. वाहनाचे 7 लाख 78 हजार रुपये व व्याज, मानसिक त्रास दिल्याचे 20 हजार आणि पाच हजार रुपये व्याज देण्याचा निकाल सांगली ग्राहक न्यायालयाने दिला आहे.
महेशकुमार तुळशीराम व्हनमोरे यांनी या प्रकरणी दावा दाखल केला होता. त्यांचे माल वाहतूकीचे वाहन दि.24 सप्टेबर 2017 रोजी त्यांच्या शेतातून चोरीस गेले. त्याची नोंद व्हनमोरे यांनी लागलीच विमा कंपनीस कळवली तसेच पोलिसात देखील कळवले. त्यावेळी पोलिसांनी वाहनाचा शोध घेऊन एफआयआर नोंद करू असे तक्रारदारास सांगितले व कच्ची नोंद करून घेतली. सदर विमा कंपनीने एफआयआर असल्याशिवाय क्लेम दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर सदर वाहनाचा शोध घेतला असता वाहन मिळून न आल्याने संबंधित पोलिसांनी वाहन चोरीस गेल्याचा एफआयआर नोंदवून घेतला. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीने मागणी केलेली सर्व कागदपत्रे कंपनीकडे जमा देखील केली. मात्र एफआयआर विलंबाने दिल्याच्या कारणास्तव दावा फेटाळला होता.
सांगली ग्राहक तक्रार निवारण आयोग सांगली येथे 145/2018 अनव्ये विमा कंपनीने दिलेल्या सेवेतील त्रुटी बाबत चोरीस गेलेल्या वाहनांची संपूर्ण रक्कम व तक्रारदाराला झालेल्या शाररिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष मुकुंद दात्ये व सदस्य आशपक नायकवडी यांनी पारित केलेल्या आदेशानुसार चोरीस गेलेल्या वाहनाची नुकसानभरपाई रु. 7 लाख 78 हजार व त्यावर 1 डिसेंबर 2017 पासून 4% व्याज व शाररिक व मानसिक त्रासपोटी रु 20 हजार व व्याज पाच हजार विमा कंपनीने द्यावे लागतील. धन्यकुमार धावते व वैभव केळकर तक्रारदाराचे वकील म्हणून काम पाहिले.
Previous Articleसांगलीकरांच्या सेवेत पुन्हा भ. महावीर कोविड हॉस्पिटल दाखल होणार
Next Article सातारा : यवतेश्वर घाटात अल्पवयीन मुलीची आत्महत्या









