स ध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, किडय़ा मुंग्यांसारखी माणसं मारायला लागली आहेत. जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, जणू जीवाची पर्वा कोणालाच नाही ! त्याचे महत्व काहीच शिल्लक नाही असे वाटायला लागले आहे. कारण आपण जीवाची किंमत वेळेला दिली आहे, आता माणसाच्या जीवापेक्षा, माणसाच्या शरीरापेक्षा वेळ अधिक मौल्यवान ठरत आहे. टीव्ही लावला, पेपर उघडला की अपघात झाल्याच्या बातम्या, सोशल मीडियावर तर न पहावणारे, मन हेलावणारे, काळजाचे ठोके वाढवणारे विचित्र अपघाताचे फोटो, व्हिडिओ आपण पाहतो. जीव कासावीस होतो, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसतसे अपघाताचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.
अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांमध्ये अधिक जनजागृती व्हायला हवी. तसेच प्रशासनाकडूनही मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय योजना करायला हव्यात, कारण हा अत्यंत गंभीर विषय आहे. अनेक अपघात हे रात्रीच्या किंवा पहाटेच्या सुमारास होतात, त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागले पाहिजे. अपघात टाळण्यासाठी जास्तीत जास्त मोठय़ा प्रमाणात प्रयत्न कसे करता येतील याचा विचार, अभ्यास केला पाहिजे. तरच अपघात रोखण्यात देशपातळीवर यश मिळेल, अन्यथा किडय़ा मुंग्यांसारखे मरण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आपलं घरी कोणी वाट पाहतंय याचा विचार वाहनचालकांनी केला पाहिजे त्याची जाणीव जेव्हा होईल तेंव्हा अपघात बऱयाच प्रमाणात टळतील.
वाहतुकीचे नियम सर्वांनी समजून घेतले पाहिजे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण स्वत:पासून घ्यायला पाहिजे, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेसुध्दा मोठय़ा प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण आहे, यावर खरंच विचारविनिमय व्हायला पाहिजे. ‘अपघातावर बोलू काही’ हा विषय व या विषयावर कधी बोलण्याची वेळच यायला नको.
वाहतुक अपघात टाळण्य्ाासाठी अवलंबनात आणावयाची उपाय योजना
वाहतुक सुरक्षेबद्दल शिक्षण-
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबद्दल, अपघातास कारणीभूत घटक व सुरक्षात्मक उपाय योजनेची व अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराची सक्तीची माहिती देणे. व्यवस्थित निगा राखलेल्या वाहनातच वाहन चालविण्यास शिकविणे.
सुरक्षात्मक उपायोजनेचे प्रसार-
दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर
चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्ट लावणे
वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे
रस्त्यांना अनुसरुन योग्य डिझाईनचे वाहन निवडणे
वाहनांची दारे व्यवस्थित बंद होतात व इतर यंत्रणा व्यवस्थित असल्याची खात्री करणे
वाहन चालवताना मद्य व अमलीपदार्थाचा वापर टाळणे.
अपघातास कारणीभूत असणारे घटक दूर करणे- जसे
रस्ते व्यवस्थित ठेवणे
नियमित खड्डे बुजविणे
योग्य गती मर्यादा पाळणे
धोक्याच्या वळणाच्या ठिकाणी सूचना फलक लावणे इत्यादी
वाहतुक नियम सक्तीने लागू करणे व त्यांचे पालन करणे
अपघात झाल्यास प्राथमिक चिकित्सा व तत्काळ सेवा उपलब्ध करुन देणे