सचिव सुदीप ताम्हणकर यांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
वाहतूक संचालकाकडे चर्चा करण्यासाठी आलो होतो. परंतु वाहतूक संचालक भेटण्यासाठी नकार देत आहे. जो माणूस बसमालकांसमोर येण्याची धाडस नाही त्या संचालकाला पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर यांनी केली.
कर सवलत, विमा अनुदान, तिकिटांचे दर ठरविण्याबाबत संघटना मागणी करत आहे. याशिवाय खासगी बसेस आणि कदंबा बसेसच्या वेळामुळे होणारे वाद मिटविण्यासाठी कदंबाच्या बसेस त्यांच्यावेळेत सोडाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. परंतु सरकार याविषयी काहीच दखल देत नाहीत. जर वाहतूक संचालक बसमालकांच्या समस्या ऐकून घेऊ शकत नाहीत तर सरकारने त्यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.









