वरिष्ठ अधिकारी-वृत्तपत्रांना निनावी पत्राद्वारे दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाचा कारभार सध्या संशयाच्या भोवऱयात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी वरि÷ पोलीस अधिकाऱयांना आलेल्या एका निनावी पत्रात या पोलीस स्थानकातील भ्रष्टाचाराचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
‘तरुण भारत’ला या पत्राची प्रत उपलब्ध झाली आहे. निनावी पत्रात 23 मुद्दय़ांचा उल्लेख करण्यात आला असून शेवटी ‘आपलेच त्रस्त पोलीस कर्मचारी’ असे लिहून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाचा शिक्काही उमटविण्यात आला आहे. यावरून पत्र निनावी असले तरी पत्रात केलेले आरोप गंभीर असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस स्थानकात मनमानी
वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा व इतर अधिकारी आणि काही पोलिसांवर पत्रात गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. पोलीस स्थानकात सुरू असलेली मनमानी, वरकमाईसाठी सुरू असलेली चढाओढ, केवळ काही जणांनाच कामाला जुंपून इतरांना वसुलीसाठी मोकाट सोडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
एसीपी शरणाप्पा यांचीही दिशाभूल
यंदे खूट व रेल्वे स्थानकावर टॅफिक सिग्नल बंद आहेत. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. अशा कामांकडे लक्ष देण्याऐवजी अधिकारी केवळ दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांचीही दिशाभूल केली जात आहे, असे नमूद करून दरमहा पाच लाखांहून अधिक हप्ता वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
वाहनांचे क्रमांकही नमूद
कोणत्या वाहनचालकांना भेटून चौकशी केल्यास यासंबंधीची माहिती उघड होईल, याचा स्पष्ट उल्लेख करीत पत्रात सदर वाहनांचे क्रमांकही दिले आहेत. एकूण 23 ठळक मुद्दय़ांकडे वरि÷ अधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले असून रोज टोईंग व्हेईकलमधून 80 ते 120 वाहने पोलीस स्थानकात आणली जातात. त्यापैकी केवळ 15 ते 20 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. उर्वरित वाहनधारकांशी परस्पर व्यवहार ठरवून सोडून दिले जाते. सोडलेल्या वाहनांची कमाईच लाखाच्या घरात असल्याची खळबळजनक माहिती पत्रात देण्यात आली आहे.
वरकमाईवरून दोन गट
पत्रातील मुद्दे लक्षात घेता वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात वरकमाईवरून दोन गट पडल्याचे दिसून येते. कमाईसाठी काही कर्मचाऱयांना त्रास दिल्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठना हे पत्र लिहिले आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. ‘तरुण भारत’ला 8 जानेवारी रोजी या पत्राची प्रत पोहोचली असून पत्रामध्ये अधिकाऱयांवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
केवळ वरकमाईच नाही तर वाहनांचे इन्शुरन्स अमूक कंपनीकडूनच करून घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. या त्रासाला कंटाळून अनेकांनी तेथून आपली बदली करून घेतली आहे तर काही जण मानसिक त्रास सहन करत सेवा बजावत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास तेथील पोलीस कर्मचाऱयांनी आत्महत्येचा निर्णय घेतला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याकडे वरि÷ांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
महाराष्ट्र, गोव्याची वाहने लक्ष्य!
आपली दैनंदिन कमाई वाढविण्यासाठी महाराष्ट्र व गोव्यातून खरेदीसाठी बेळगावात येणाऱया वाहनधारकांना अडवून त्यांना लुटण्याचा धंदाच सुरू आहे. यासंबंधीही पत्रात आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ठप्प असलेली बेळगावची बाजारपेठ पूर्ववत होत आहे. दर शनिवार व रविवारी गोवा व महाराष्ट्रातून खरेदीसाठी बेळगावात मोठय़ा प्रमाणात नागरिक येतात. त्यांना अडवून अक्षरश: नागवले जात आहे. साहजिकच त्याचा परिणाम बेळगाव येथील व्यापारावर होणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या पत्राची दखल घेत संबंधितांवर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी या पत्राची दखल घेतली असून वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांना पत्रातील आरोपांची शहानिशा करण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंबंधी शरणाप्पा यांच्याशी संपर्क साधला असता आपल्यालाही पत्राची प्रत मिळाली आहे. वरि÷ अधिकाऱयांच्या सूचनेवरून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









