नैर्त्रुत्य रेल्वेच्या निर्णयाचे शेतकऱयांमधून स्वागत
प्रतिनिधी /बेळगाव
वास्को-हजरत निजामुद्दीन ही रेल्वे दि. 18 ऑक्टोबरपासून बेळगाव रेल्वेस्थानकावर 10 मिनिटे थांबणार आहे. बेळगावमधून दिल्लीला शेतीमाल तसेच इतर साहित्याची वाहतूक केली जाते. परंतु यापूर्वी केवळ 5 मिनिटे रेल्वे थांबत असल्यामुळे माल चढविणे किंवा उतरविणे गैरसोयीचे होत होते. त्यामुळे हा कालावधी वाढवून 10 मिनिटांचा करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी तसेच व्यापाऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वास्को-निजामुद्दीन ही रेल्वे सायंकाळी 7.25 वा. बेळगाव स्थानकात दाखल होऊन 7.35 वा. दिल्लीकडे रवाना होणार आहे. तर निजामुद्दीन-वास्को रेल्वे रात्री 12.50 वा. बेळगावमध्ये दाखल होऊन 1 वा. वास्कोकडे रवाना होईल, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे.









